शांता गोखले : “मन उद्विग्न होते, पण धीर धरून आहे...”
इतिहासाला सामोरं जाण्याचं नैतिक बळ आपल्यात का नाही? खोट्या इतिहासाबद्दल गर्व मानायचा हा कसला पळपुटेपणा? या सर्व प्रश्नांनी मन उद्विग्न होतं, तेव्हा काळ वर्तुळाकारी आहे या विचाराने मनातली आशा जागृत ठेवावी. देशाच्या कानाकोपऱ्यांत याही परिस्थितीत विचारी, विवेकी, बुद्धिनिष्ठ माणसं आहेत आणि ती देशाला प्रगल्भ करण्याच्या कामात, न्याय्य समाज घडवण्याच्या कार्यात अखंड गुंतलेली आहेत हा विचार मन खुलवतो.......